पुणे : आपत्ती व्यवस्थापनाचा एवढाच अनुभव असेल तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वुहान- चीनला पाठवा, असा हल्लाबोल युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केला आहे.
भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी आज ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. 'कोरोनावर मात करण्यासाठी शून्य प्रशासकीय अनुभव असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज आहे, असे डावखरे यांनी म्हटले आहे. त्यावर सरदेसाई यांनी सडकून टीका केली आहे. "तर अशा राजकारण्यांचे पहिले क्वारंटाइन केले पाहिजे, शहाणपण नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग ? अशी बोचरी टीका केली आहे. त्यापलीकडे जाऊन आपत्तीची एवढा अनुभव असलेल्या तुमच्या नेत्याला चीन, इटलीला घेऊन जाण्याचा सल्लाही त्यांनी डावखरेंना दिला आहे.
सरकारनामा पोल
कोरोनाला थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे धडाडीने निर्णय घेत आहेत. त्याचवेळी राज्यातील लोकांना दिलासा देत, कोरोनाचे युध्द जिंकण्याचा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला आहे. ही स्थिती हाताळण्यारून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची पाठ सोशल मिडीयात थोपटली जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थिती कशी हाताळली असता ? यावर 'सरकारनामा'ने पोल घेतला. तेव्हा, 'सरकारनामा'वर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात मुख्यमंत्री ठाकरेंसह टोपेंचे कौतुक करताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना चिमटे काढण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.